Tomato Prices in Panchavati Market Drop Sharply : पंचवटी कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला केवळ ५० ते २३० रुपये प्रति कॅरेट भाव मिळाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नऊ हजार कॅरेटची आवक झाली आहे.
पंचवटी: टोमॅटोला गेल्या महिन्यात चांगला भाव मिळत होता. मात्र, आठ दिवसांपासून घसरण होताना दिसत आहे. सोमवार (ता. १) झालेल्या लिलावात किमान पन्नास रुपये, सर्वाधिक साडेचारशे रुपये भाव मिळाला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.