नाशिक- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंच आरक्षण सोडतीचे वेळापत्रक प्रशासनाने घोषित केले आहे. आरक्षण सोडतीसाठी प्रशासकीय लगबग बघता महिनाअखेरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका लागतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. .राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानंतर राजकीय वर्तुळात आता ग्रामपंचायत निवडणुकांची चर्चा रंगली आहे. दीड ते दोन महिन्यांपासून इच्छुक व राजकीय पक्षांकडून निवडणुकीबाबत रोज नवनवीन आखाडे बांधले जात आहेत. पण, राज्यस्तरावर निवडणुकांवरून शांतता असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली होती. जिल्हा प्रशासनाने बिगरअनुसूचित क्षेत्राबाहेरील ८१० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षण सोडतीसाठी २१ तारखेचा मुहूर्त काढला आहे. .२३ तारेखला या सर्व ग्रामापंचायतींसोबतच अनुसूचित क्षेत्रातील ५१७ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचासाठी ५० टक्के जागा आरक्षीत केल्या जाणार आहेत. त्यामुळे मुदत संपुष्टात आलेल्या तसेच येत्या काळात मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला जाऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष निवडणुका आयोगाकडे लागले आहेत..परीक्षा संपण्याची प्रतीक्षाराज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा मार्चमध्ये झाल्या आहेत. परंतु, पहिली ते नववी, अकरावी तसेच वरिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षा संपण्याची प्रतीक्षा निवडणूक आयोगाला आहे..शासनाने २५ एप्रिलपर्यंत शाळांच्या परीक्षा पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परीक्षा पार पडल्यानंतर मतदानासाठी शाळा तसेच मतदान प्रक्रियेसाठी शिक्षक उपलब्ध होणार आहेत. एकूणच परिस्थिती विचारात घेऊन आयोगाकडून निवडणुकांचा कार्यक्रम विलंबाने घेण्यासाठी आग्रही दिसून येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.