Crime sakal
नाशिक
Nashik Crime : पंचवटीत आयुर्वेदिक औषधी बॉटल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघे अटकेत
Panchvati Police Recover Stolen Medicine Boxes : नाशिकच्या पंचवटी येथील गणेशवाडीतील आयुर्वेदिक सेवा संघ संचलित औषधी भवनमधून औषधी बॉटलचे अल्युमिनियमचे झाकणांचे बॉक्स चोरणाऱ्या तीन चोरट्यांना पंचवटी गुन्हे शोध पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले आठ बॉक्स हस्तगत करण्यात आले आहेत.
पंचवटी- गणेशवाडीतील आयुर्वेदिक सेवा संघ संचलित औषधी भवन येथील स्टोअर रूममधील औषधी बॉटलचे अल्युमिनियमची झाकणांचे बॉक्स चोरणाऱ्या तीन चोरट्यांना जेरबंद करण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. संशयितांकडून औषधी बॉटलचे आठ बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे.