पंचवटी: नांदूर नाका परिसरात दोन युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. यात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते आणि त्यांनीच गुंडांना बरोबर घेऊन स्वतः त्या युवकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे. जखमी व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद असूनदेखील अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही.