पंचवटी: दुचाकीचे चाक पायावरून गेल्याच्या कारणावरून नांदूर नाका येथे हाणामारीची घटना घडली. वाद वाढून नंतर कृषिनगरच्या रस्त्यावर दोन गटांत हाणामारीतून राहुल धोत्रे व अजय कुसाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात राहुल धोत्रे हा गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.