पंचवटी- ओझरहून नाशिककडे येणारी ‘आय ट्वेन्टी’ कार आडगाव शिवारातील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून धडकली आणि काही क्षणांतच पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) रात्री सुमारे अकरा वाजता घडली. सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर पडल्याने तो सुखरूप बचावला. मात्र कार संपूर्णतः जळून खाक झाली.