Crime
sakal
पंचवटी: गजानन चौकातील कोमटी गल्लीत सोमवारी (ता. १३) भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या थराराचे चित्रण सीसीटीव्ही आणि नागरिकांच्या मोबाईलमध्ये झाले होते. या फुटेजच्या आधारावर पंचवटी पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट एकने तपास सुरू करत एका विधी संघर्षित बालकासह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.