पंचवटी- निमाणी परिसरात रिक्षा चालकाने पादचाऱ्यास धडक दिली. यावेळी पादचाऱ्याच्या मित्राने पाठलाग करत रिक्षा अडवली. रिक्षा अडविल्याचा राग आल्याने चालकाने एकावर धारदार हत्याराने वार करत त्यास जखमी केल्याची घटना बुधवारी (ता.९) रात्री घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.