Gas Shortage Triggers Price Rise in Pani Puri Puris : नाशिकमध्ये गॅस टंचाईमुळे पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुरीच्या पॅकेटचा दर वाढला असून, पुरवठा उशिरा होत असल्याने पाणीपुरी विक्रेत्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नाशिक: पाणीपुरी म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. जिभेला तिखट-गोड चव देणाऱ्या पाणीपुरीचे एक पॅकेट (७० पुरी) आठ रुपयांनी महागल्याने पाणीपुरीलाही गॅस टंचाईचा झटका बसला आहे.