सातपूर: दोन दशकांपासून रखडलेल्या सीईटीपी (कॉमन इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट) प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपला आर्थिक सहभाग दुपटीने वाढवून दहा टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित ७० टक्क्यांहून अधिक आर्थिक भार उद्योग विभागाने घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाशिककरांचे दीर्घकाळचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.