Crime
sakal
पनवेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघातग्रस्त महिलेचा तसेच काही किलोमीटर अंतरावर लहान मुलीचा असे दोन मृतदेह आढळून आले. मृतदेहांची ओळख पटत नव्हती. काही आठवड्यांनी ओळख पटली. मृतदेहावर नातलगांनी अंत्यसंस्कार केले. पण मृत महिलेचा पती आलाच नाही. पनवेल पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक निरीक्षक गौतम सुरावडे यांनी तपास सुरू केला आणि तब्बल पाच वर्षांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले.