ग्रामीण महिला दिनाचा लेख

ग्रामीण महिला  दिनाचा लेख
Published on: 
NGL26B04097 निमगूळ : पापड तयार करताना मानसी बागल. ---------- मानसी बागल यांची पापड उद्योगात भरारी बचतगटाच्या माध्यमातून मुलांना केले उच्चशिक्षित विजय बागल : सकाळ वृत्तसेवा निमगूळ, ता. १४ : येथील श्रीमती मानसी अमृतराव बागल यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता स्वबळावर काहीतरी करावे या उद्देशाने एकवीरा महिला बचत गटाच्या माध्यमातून २०१९ साली कर्ज घेऊन पापड उद्योग सुरू केला. आजच्या स्थितीत उद्योगाच्या माध्यमातून अद्यावत मशिनरी उभी करून उद्योगाला चालना मिळाली. त्यातून मुलाचे ‘एमएससी’ व मुलीला ‘एमबीए’चे शिक्षण देत उच्चशिक्षित केले. मुलगी बँकेत नोकरीला लागली याचा आनंद आजही आहे. बचतगटाच्या माध्यमातून ‘माँ चंडिका माता पापड गृहउद्योग’ सुरू केला असून, उद्योगाला चालना मिळत गेली. त्या माध्यमातून मुलांचे उच्च शिक्षण केले. मुलीचे लग्नही केले. पिठाच्या गिरणीतून घरखर्च निघत होता. पापड उद्योगाला बचतगटाच्या माध्यमातून चालना मिळत आहे. त्यातून सहा महिलांना काम मिळाले. मुलगा पुण्याला शिक्षण घेत आहे. यात बचतगटाचे व्यवस्थापक राजेंद्र पाटील, सी. सी. पानपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला जैन यांचे सहकार्य लाभले. ------ भविष्यात बचतगटाच्या माध्यमातून पापड उद्योगात वाढ करायची असून, उद्योग वाढवायचा आहे. त्यामुळे माझ्यासह अनेक महिलांना काम मिळेल, यातच आनंद आहे. - मानसी बागल, निमगूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com