JEE Mains Exam 2024 : जेईई मेन्‍स पेपर-2 ला 700 विद्यार्थी हजर; शनिवारपासून 2 सत्रांमध्ये पेपर-1चे आयोजन

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे जॉइंट एंट्रन्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२४ या परीक्षेला बुधवारी (ता.२४) सुरवात झाली.
JEE Mains Exam 2024
JEE Mains Exam 2024esakal

JEE Mains Exam 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे जॉइंट एंट्रन्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२४ या परीक्षेला बुधवारी (ता.२४) सुरवात झाली. आर्किटेक्‍चर व प्‍लॅनिंग या विषयांतील पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पेपर क्रमांक दोनसाठी नाशिक केंद्रावरून सुमारे सातशे विद्यार्थी सामोरे गेले.

दरम्‍यान बी.ई/बी.टेक. साठीच्‍या पेपर क्रमांक दोनचे आयोजन शनिवार (ता.२७) केले आहे. (Paper 1 Conducted in 2 Sessions from Saturday of JEE mains exam 2024 nashik news)

‘एनडीए’तर्फे जेईई मेन्‍स परीक्षा देण्याच्‍या दोन संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध करून दिलेल्‍या आहेत. जानेवारीमधील प्रथम सत्राच्‍या परीक्षेला सुरवात झालेली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार बुधवारी (ता.२४) दुपारच्‍या सत्रात दुपारी तीन ते सायंकाळी साडे सहा या वेळेत पेपर क्रमांक दोनचे आयोजन केले होते.

JEE Mains Exam 2024
JEE Main Exam : जानेवारीत होणारी जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

आर्किटेक्‍चर आणि प्‍लॅनिंग या शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली. ऑफलाइन व ऑनलाइन असे या परीक्षेचे स्वरूप होते. दरम्‍यान शनिवार (ता.२७) ते १ फेब्रुवारीदरम्‍यान जेईई मेन्‍सचा पेपर क्रमांक एक होणार आहे.

आयआयटी, आयआयआयटी, एनआयटी यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये अभियांत्रिकी पदवी (बीई/बी.टेक.) अभ्यासक्रमात प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा होणार आहे. पाच दिवसांत सुमारे साडे अकरा हजार विद्यार्थी पेपर क्रमांक एकला सामोरे जातील.

JEE Mains Exam 2024
JEE Main Exam : ‘जेईई मेन्‍स’मध्ये नाशिकचे विद्यार्थी चमकले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com