esakal | परमबीर सिंगची साथीदाराच्या नावे सिन्नरला करोडोंची प्रॉपर्टी? राजकीय व हायप्रोफाइल वर्तुळात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

parambir singh

परमबीर सिंगची साथीदाराच्या नावे सिन्नरला करोडोंची प्रॉपर्टी?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-शिर्डी महामार्गालगत (sinner-shirdi highway) असलेल्या शेतजमिनी खरेदीसाठी एकेकाळी मुंबईतील बड्या राजकीय व्यक्ती, उद्योगपतींसह हायप्रोफाइल व्यक्तींच्या उड्या पडल्या होत्या. त्यामुळे या जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. एका खरेदी प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांच्या कथित साथीदारा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. यामुळे राजकीय व हायप्रोफाइल वर्तुळात खळबळ उडाली आहे.

परमबीर सिंगची साथीदाराच्या नावे सिन्नरला बेनामी संपत्ती?

परमबीर सिंग यांनी साथीदाराच्या नावे बेनामी संपत्ती केल्याची चर्चा असून, त्यादृष्टीने राज्य गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिस यंत्रणा तपास करीत आहे बनावट शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र जोडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा कथित साथीदार असलेल्या संजय पुनूमिया याने धारणगाव व मिरगाव (ता. सिन्नर) येथे शिर्डी महामार्गालगत तब्बल साडेदहा हेक्टर शेतजमीन खरेदी केली आहे. धारणगाव येथील २००७ मधील एका खरेदी प्रकरणात पुनूमियाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. सिन्नर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. परमबीर सिंग प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संजय मिश्रीलाल पुनूमिया यानेही २००७ मध्ये धारणगाव येथील शिर्डी मार्गालगत असलेली शेती गट क्रमांक ३१० मध्ये एक हेक्टर ७८ आर जमिनीची खरेदी केली होती. हे खरेदीखत नोंदविताना त्याने उत्तन (ता. ठाणे) येथील एका शेती गटाचा बनावट सातबारा उतारा सादर केला होता.

हेही वाचा: समीर वानखेडेंच्या करिअरमागे 'या' व्यक्तीचा मोठा वाटा; पत्नीचा खुलासा

फसवणुकीचा गुन्हा दाखल

दीर्घ कालावधीनंतर या जमीन खरेदी प्रकरणाची सुई परमबीरसिंग यांच्याकडे सरकल्यानंतर पुनूमिया याचे शेतकरी असल्याचे ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर सिन्नर येथील दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांच्या तक्रारीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परमबीर सिंग यांनी पुनूमिया याच्या नावे बेनामी संपत्ती केल्याची चर्चा असून, त्यादृष्टीने राज्य गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. दरम्यान, सध्या ठाणे येथे अटकेत असलेल्या पुनूमियाला येथे आणल्यानंतर या गुन्ह्यातील तीव्रता अधिक स्पष्ट होईल.

हेही वाचा: PM मोदी आज करणार 100 लाख कोटींच्या 'गतीशक्ती' योजनेचा शुभारंभ

अशा आहेत पुनूमियाच्या जमिनी

सिन्नर तालुक्यात पुनूमिया याच्या नावाने धारणगाव येथील भोकणनाला शेजारच्या शेती गट क्रमांक ३१० मध्ये एक हेक्‍टर ७८ आर क्षेत्र आहे. याच खरेदीसाठी त्याने सादर केलेला शेतकरी असल्याचा सातबारा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच शेतीलगत असलेल्या गट क्रमांक ३११ मध्येही संजय व त्याचा मुलगा सनी पुनूमिया याच्या नावे दोन हेक्टर २६ आर सामाईक क्षेत्र खरेदी करण्यात आले आहे. धारणगाव येथील एकूण शेतजमीन चार हेक्टरच्या आसपास आहे. मिरगाव शिवारातही सायाळे फाट्यावर शिर्डी मार्गाला लागून शेती गट क्रमांक ४७७-१ मधील चार गट उभय पिता-पुत्रांच्या नावाने असल्याचा सातबारा ‘सकाळ’च्या हाती लागला. या ठिकाणी हायवे फ्रंट असलेली सहा हेक्‍टर ३८ आर एवढी जमीन पुनूमिया याच्या नावे आहे. पाथरे येथे गोदावरी कालव्यालगत विहीर खोदण्यासाठी एक गुंठा क्षेत्र खरेदी केल्याची नोंद असून, तेथून पाइपलाइन करून मिरगाव येथे पाणी आणण्यात आले आहे.

loading image
go to top