Nashik : शिकवणीसाठी पालक विद्यार्थ्यांची धावाधाव

private tution
private tutionesakal

नाशिक : व्‍यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) पदवीच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसोबत (CET Exam) इयत्ता बारावीच्‍या गुणांना महत्त्व दिले जाणार असल्‍याचे सूतोवाच केले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांनी आतापासून नियोजनाला सुरवात केली आहे. बारावीचा शिक्षणक्रम व प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या शिकविण्यांमध्ये चौकशीसाठी गर्दी होत आहे. (Parents students rush for tutions Nashik News)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सीईटीसोबत इयत्ता बारावीच्‍या गुणही ग्राह्य धरले जातील, असे सूतोवाच करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता इयत्ता बारावीत प्रवेश घेतलेले, तसेच अकरावी प्रवेशाच्‍या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून त्‍यादृष्टीने नियोजन आखले जात आहे. सीईटी, जेईई, नीटसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करताना इयत्ता बारावीच्‍या गुणांकडे दुर्लक्ष राहायला नको, याची खबरदारी घेतली जात आहे. सर्वसमावेशक अभ्यास होण्याच्‍या दृष्टीने अभ्यासाचे वेळापत्रक आखले जात आहे. अनेकांकडून बारावीचा अभ्यासक्रम व प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या शिकविण्यांची निवड केली जात आहे.

अकरावी प्रवेशापूर्वी शिकविण्यांची बुकींग

अद्याप अकरावीचे प्रवेश झालेले नाहीत. तत्‍पूर्वी दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी व पालकांकडून विविध शिकविण्यांना भेटी देत तेथील सुविधा, अध्ययन पद्धतीचे माहिती घेण्याचे काम सुरू होते. अकरावी प्रवेश निश्‍चित झाला नसताना अनेक विद्यार्थ्यांनी शिकवणीचे आगाऊ बुकींग केले आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शिकविणी चालकांकडून लवकरच अध्ययन प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

private tution
दगडू तेली यांच्या दुकानावर वनविभागाचा छापा; वन्यजीवांचे अवयव जप्त

"लाखो विद्यार्थी जेईई मेन्‍स परीक्षेला जातात. त्‍यापैकी काही हजार विद्यार्थी आयआयटीत प्रवेशास पात्र ठरतात. अशात प्रवेश परीक्षांचे योग्‍य नियोजनाने अभ्यास करण्याला महत्त्व आहे. प्रवेशासाठी बारावीची कामगिरी ग्राह्य धरली जाणार असल्‍याने तसे नियोजन आखले जात आहे. सर्वसमावेशक अभ्यास घेण्यावर भर राहणार आहे."

-प्रमोद पाटील, संचालक, स्‍मार्ट एज्‍युकेशन

private tution
Nashik : मतदारांच्या सन्मानार्थ आयुक्त मैदानात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com