नामपूर- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहारात सोयामिल्क देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षभरापासून त्याची अंमलजावणीच न झाल्याने पालकांसह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याकामी लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण आहारात सोयामिल्क योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.