
Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!
सिडको (जि. नाशिक) : परिसरातील श्री मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था झाली असून, खेळण्या तुटल्या आहेत. काही खेळणी येथे होत्या की नव्हत्या, अशी स्थिती येथे दिसून येते. उद्यानात दिवसभर प्रेमीयुगुलांचा ताबा असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
मृत्युंजय मंदिर उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी आणणे अयोग्य असून, येथील काही खेळणी चोरीला गेल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे. (Park toys looted by thieves Mrityunjay Mahadev Temple Park state of disrepair Nashik News)
उद्यान विभागाने या उद्यानाकडे पाठ फिरवली असल्याचे वास्तवादी चित्र दिसून येत आहे. उद्यानात पथदीपांचे नादुरुस्त पोल येथे आणून टाकण्यात आले असून, स्वच्छतेचादेखील बोजवारा वाजला आहे.
उद्यानात सोयीनुसार वृक्षांसाठी काठ्या बांधण्यात आल्या असल्याने उद्यानाची शोभा जात आहे. उद्यानात तोडलेल्या वृक्षाचे लाकडे मोठ्या प्रमाणावर आणून ठेवली आहेत. उद्यान परिसरात दिवसभर प्रेमीयुगुलांचा वावर असून, स्थानिक परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.
तर, उद्यानात मंदिर असल्याने अनेकजण मोठ्या भक्तिभावाने सहकुटुंब येथे दर्शनासाठी येत असतात. येथील प्रेमीयुगुल बघून नागरिक येथे येण्याचे टाळत असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
हेही वाचा: Tribal Culture Sculpture : मूर्तीमधून आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा काकडांचा मानस!
श्री मृत्युंजय महादेव मंदिर उद्यान
* खेळणी तुटलेल्या
* काही खेळणी चोरीला गेल्याचा आरोप
* प्रेमीयुगुलांचा ताबा
* कचऱ्याचे साम्राज्य
* उद्यानात रात्री पेटतात शेकोट्या
* उद्यानास सुरक्षारक्षक हवा
"उद्यानातील खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून, एक खेळणी नावापुरते बसवली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्यान विभाग झोपेत असल्याचे दिसत आहे. येथील समस्या त्वरित सोडवाव्यात."- अनिता सोनवणे, गृहिणी
"उद्यानात श्रीमहादेवांचे दर्शन घेण्यास येत असतो. उद्यानातील बाकांवर प्रेमीयुगुलांचा घोळका बसलेला असतो. त्यांना सांगणार कसे हे कळत नसून ऐन रस्त्यावर असलेल्या उद्यानात पोलिस गस्त खूपच गरजेची आहे."- कल्पना पाटील, गृहिणी
"उद्यानात मोठ्या प्रमाणावर कचरा असून, तुटलेल्या वृक्षांचे फांद्या आणून टाकण्यात आलेल्या आहेत. उद्यानाची स्वच्छता फक्त नावापुरतीच होते की काय, असे वाटते."
- सायली मोरे, गृहिणी
"महापालिका प्रशासन उद्यानातील समस्यांकडे लक्षच देत नसून, उद्यान हे फक्त नावालाच उरले आहे. उद्यानात समस्याच समस्या असून, या कोण सोडवणार हा मोठा प्रश्न आहे."
- प्रतीक्षा साठे, गृहिणी
हेही वाचा: Kamgar kalyan Natya Spardha : समाजाला दिशा दाखवणारी नाट्यकृती ‘दिशा’