Nashik Eyes Infection: डोळ्यांच्या साथीमुळे उद्याने बंद

Eye Infection
Eye Infectionesakal

Eye Flu : शहरात मोठ्या प्रमाणात डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी महापालिका हद्दीतील सर्व उद्यान ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Parks closed due to eye infection nashik)

Eye Infection
Jalgaon Eye Infection : डोळ्यांच्या संसर्गजन्य रोगाचे रुग्ण वाढले; अशी घ्या काळजी...

आत्तापर्यंत शहरात साडेपाच हजार डोळ्यांच्या साथीची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. मुंबई, पुणे व ठाणे पाठोपाठ शहरात मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ सुरू झाली आहे.

या शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये डोळे येण्याची साथ कमी असली तरी रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. डोळे येण्याच्या संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी महापालिकेकडून जनजागृती करीत विविध उपाययोजना सांगितल्या जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून १८ ऑगस्टपासून शहरातील उद्याने ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आतापर्यंत शहरात ५५०० रुग्णांनी डोळ्यांच्या आजारावर उपचार घेतले असून, गुरुवारी (ता. १७) २५५ नवीन रुग्णांची भर पडली.

Eye Infection
Nashik News: सिग्नलजवळील बसथांबे बनले अडथळे! विविध ठिकाणी वाहतूक कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com