सेकंडमेन
------------
पारोळा : गतिरोधक नसलेला पारोळा-अमळनेर रस्ता.
---------------------------
पारोळा-अमळनेर रस्ता गतिरोधकविना
---------
NSK26H31243
अपघाताची भीती; तातडीने उपाययोजना करण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
पारोळा, ता.३ : अमळनेर-भडगाव राज्य महामार्ग ४६वरील पारोळा-अमळनेर रस्ता
नव्याने तयार करण्यात आल्याने वाहतुकीची तारांबळ थांबली. रस्ता खड्डेमुक्तही झाला. मात्र, या रस्त्यावर वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही गतिरोधक नसल्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. म्हणून तात्काळ या रस्त्यावर गतिरोधक व दिशादर्शक फलक लावण्याची मागणी या भागातील वसाहतधारक व पालकांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पारोळा-अमळनेर रस्त्याचे काम होत नसल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, पारोळा-अमळनेर-भडगाव असा राज्य महामार्ग ४६ हा नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र, या रस्त्यावर वाहने सुसाट धावत असल्याने संबंधित विभागाने वेगमर्यादेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. या रस्त्यालगत नवीन वसाहती, महावितरण कार्यालय, पारेषण कार्यालय, शैक्षणिक संस्था आहेत. म्हणून या मार्गावर गतिरोधक बसविण्याची केली जात आहे. दरम्यान, गतिरोधक बसविल्यास वाहनांना वेगाची मर्यादा येईल, विद्यार्थी व वसाहतधारकांना दिलासा मिळेल आणि अपघातांना आळा बसेल.
--------
कोट
नवीन वसाहती सुविधांपासून अगोदरच वंचित आहोत. त्यातच पारोळा-अमळनेर नवीन रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची भीती वाढली आहे. म्हणून तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे.
- दिलीप चौधरी, वसाहतधारक, पारोळा.
----
कोट
पारोळा-अमळनेर रस्ता नव्याने झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची वर्दळ वाढू लागली आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातच वाहने भरधाव जातात. म्हणून परिसरात गतिरोधकाची आवश्यकता आहे.
- ज्ञानेश्वर महाजन, पालक, पारोळा.
-------
कोट
या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची परवानगीची आवश्यकता असते. परवानगी मिळाल्यानंतर या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात येईल.
- संदीप पाटील, निवासी अभियंता, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ.