शीर्षक
‘पातञ्जल योगसूत्राणि’च्या मुखपृष्ठाचे
डॉ. अग्रवाल यांच्या हस्ते प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२९ : भारतीय योगपरंपरा आणि महर्षी पतंजली यांच्या योगतत्त्वज्ञानाचा परिचय इंग्रजी भाषेतील वाचकांना करून देण्याच्या उद्देशाने योगशिक्षक व लेखक डॉ. कृणाल महाजन लिखित ‘पातञ्जल योगसूत्राणि – या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पुस्तकाच्या आशयाची माहिती जाणून घेत डॉ. अग्रवाल यांनी लेखकाच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्याचे कौतुक केले.
डॉ. कृणाल महाजन आणि डॉ. रेणुश्री बनसोड यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन १४ नोव्हेंबर २०२६ रोजी धुळे येथे महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे आयोजित ‘महायोगोत्सव २०२६’ या योग संमेलनात होणार आहे. योगशास्त्रातील पारंपरिक संकल्पना सोप्या अर्थासह इंग्रजी भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
या वेळी महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. संजय शेखावत, रजिस्ट्रार डॉ. अरुण पाटील, अभियांत्रिकी प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडदकर, प्रा. वसीम पटेल आणि मानव संसाधन व्यवस्थापक मयूर गोपाले उपस्थित होते.