पटेल सैनिकी शाळेत
परिपाठाची सांगता
शिरपूर : तांडे येथील मुकेशभाई आर. पटेल सैनिकी शाळेत विशेष परिपाठ उपक्रमाची समारंभपूर्वक सांगता झाली. तरडी येथील एसव्हीकेएम फार्मसीचे प्राचार्य डॉ. विवेककुमार रेदासनी, प्राचार्य दिनेशकुमार राणा उपस्थित होते. भारतीय प्रतिज्ञेचे वाचन करून विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची शपथ घेतली. परिपाठ समिती प्रमुख स्नेहा बुरसे यांनी प्रास्ताविक केले. संस्कृती टापरे हिने सूत्रसंचालन केले. वर्षभर झालेल्या परिपाठांच्या मूल्यमापनानुसार नववीच्या वर्गाला ‘प्रथम सत्र परिपाठ चषक’ बहाल करण्यात आला. मनोज बहारे, सुवर्णा माळी, सतीश सोमवंशी, यतीन पाटील, नंदकिशोर बाविस्कर, शशिकांत जाधव, शरद पवार, व्हेरोनिका फर्नांडिस, ज्योत्स्ना जाधव, दीपश्री गोसावी, दिप्तीका शेगांवकर, चंद्रसिंग पावरा, सुवर्णा माळी, चैताली बागूल, सुभान दास, मनोज बहारे, अनिल रोकडे आणि प्रदीप गिरासे आदींनी संयोजन केले.
‘आयएमआरडी’मध्ये
संवाद सत्रात मार्गदर्शन
शिरपूर : येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंटमध्ये आय. पी. आर. आणि इंडस्ट्री- इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन कमिटीतर्फे इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट संवाद सत्र नुकतेच घेण्यात आले. मुंबई येथील वरिष्ठ सल्लागार तथा समुपदेशक पूजा जोशी यांनी वित्तीय बाजारपेठ, म्युच्युअल फंड, गुंतवणुकीविषयी जागरूकता तसेच वित्त क्षेत्रातील विविध करिअर संधी याविषयी मार्गदर्शन करुन बदलत्या आर्थिक परिस्थितीत वित्तीय ज्ञान, गुंतवणुकीचे नियोजन आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. बँकिंग, वित्तीय सेवा, गुंतवणूक सल्लागार सेवा, म्युच्युअल फंड, आर्थिक नियोजन आणि संपत्ती व्यवस्थापन आदी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत त्यांनी माहिती दिली. संस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, डॉ. मनोज बेहेरे, डॉ. मनोज पटेल, डॉ. तुषार पटेल, प्रा. छाया पाटील, डॉ. अमरसिंह गौर, डॉ. योगेश शेठिया, प्रा. मिलिंद पाटील, प्रा. ज्योती गोराणे- लोहार आदींनी संयोजन केले.
वरूळ विद्यालयात
दिवाळी स्नेहमिलन
शिरपूर : वरूळ येथील आर. सी. पटेल इंग्लिश स्कूलमध्ये आजी- आजोबा दिन आणि दिवाळी स्नेहमिलन सोहळा नुकताच पार पडला. जवखेडा येथील सरपंच हिराबाई ठाकरे, समन्वयक भारती सोनवणे, मुख्याध्यापिका सपना मराठे व पालक उपस्थित होते. श्रीमती मराठे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. संगीत शिक्षक हंसराज कोळी, नृत्य शिक्षक श्यामकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागतगीत सादर करण्यात आले. आजोबा, आजींना विद्या पाटील, रागिणी चौधरी यांनी विविध खेळांत सहभागी करुन घेतले. गायत्री शिंदे, अश्विन पवार, लोकेश बोरसे यांनी विविध उपक्रम सादर केले. विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. रुपाली पाटील व भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ममता पाटील यांनी आभार मानले.
(महेश भावसार : SHC26B13616)
प्रा. महेश भावसार
यांना पीएच.डी.
शिरपूर : येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंटचे सहाय्यक प्राध्यापक महेश किशोर भावसार यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेमार्फत पीएच. डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘अ स्टडी ऑन बायिंग परसेप्शन ॲन्ड सटिस्फॅक्शन टुवर्ड्स ऑनलाइन शॉपिंग थ्रू एम-कॉमर्स अमंग वर्किंग विमेन विथ रेफरन्स टू धुळे ॲन्ड नंदुरबार डिस्ट्रिक्ट’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना धुळे येथील सिस्टेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चचे संचालक डॉ. हंसराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाचे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, सचिव राजगोपाल भंडारी, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी कौतुक केले.
पटेल कन्या शाळेची
पाच दिवसांची दिवाळी
शिरपूर : येथील एच. आर. पटेल कन्या शाळेत दिवाळीत पाच दिवसांची पूजा मांडून प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. प्राचार्य गजानन पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील, मुख्याध्यापक विवेकानंद ठाकरे उपस्थित होते. शिक्षिकांनी दिवाळीच्या वसू बारसपासून भाऊबीजेपर्यंतच्या सणांची मांडणी केली होती. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज हे सण साजरे करुन त्याबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. सहभागींना प्रदूषण मुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली. रुपेश कुलकर्णी व अविनाश राजपूत यांनी सूत्रसंचालन केले.