नाशिक- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कारमधून आलेल्या संशयिताने पाथर्डी गाव परिसरातून एकाचे अपहरण केले. त्यानंतर त्यास कारमधून ठिकठिकाणी फिरवून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून बँक खात्यातील पाच लाख काढून घेत, दहा लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत अपहरणासह खंडणीचा गुन्हा चौघांविरोधात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासाता संशयित सराईत गुन्हेगार असून, त्याच्या मागावर पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.