इंदिरानगर: पाथर्डी फाटा येथील चौकात रोजच होणारे अपघात आणि भीषण वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी शुक्रवारी (ता. ८) आमदार सीमा हिरे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नाशिक - मुंबई महामार्गावरील पाथर्डी फाटा येथील चौकात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली.