इंदिरानगर- नाशिक शहरातील सर्वांत मोठे भौगोलिक क्षेत्र असणारा प्रभाग म्हणून पाथर्डी परिसरातील प्रभाग ३१ ची ओळख आहे. दोन तासांवर आलेल्या ठाणे-मुंबईच्या कनेक्टिव्हिटीमुळे या भागाचा झपाट्याने विकास होत आहे. मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी राहण्यास आले आहेत. मात्र रस्ते, पाणी, पथदीप या नागरी समस्यांमुळे लाखोंची घरे घेऊन ही मंडळी हैराण झाली आहेत.