कोरोनातून मुक्तीनंतर रुग्ण केसगळतीने बेजार

hair loss after corona recovery
hair loss after corona recoveryesakal

नाशिक : सद्यःस्थितीत कोरोनाबाधितांचे (Coronavirus) प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत असले तरी कोरोना संसर्गानंतर होणाऱ्या आजारांचे (disease after corona) रुग्ण आता विविध तज्ज्ञांकडे येऊ लागली आहेत. यात केसगळतीचे रुग्ण अधिक वाढत असल्याचे त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले. (Patients suffer from hair loss after recovering from corona)

का होते केस गळती?

सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सचिन येवले यांनी सांगितले, की कोरोना किंवा दुसरा कोणताही आजार ज्यामध्ये ताप शंभर किंवा १०१ च्या वर असतो. अशांमध्ये आजारातून बरे झाल्यावर काही दिवसांनी केसगळतीचे प्रमाण खूप वाढते. याचे कारण असे, की केस हे सदैव आणि दररोज वाढतात. जर त्यांच्या पोषणक्रियेमध्ये खंडत्त्व आले, तर त्यांची वाढ खुंटते आणि ते गळतात. याला टेलोग्न एफ्लुरियम (Telogen Effluerium) असे म्हटले जाते. साधारणतः टेलोग्न एफ्लुरियम कोणताही ताप, ताणतणाव, अवेळी झोप आणि अवेळी जेवण, औषधांचा वापर यामुळे दिसून येते. तापातून बरे झाल्यावर ३० ते ९० दिवसांदरम्यान केसगळती जाणवते. याचे कारण म्हणजे इतके दिवस केस आपल्याजवळ असलेल्या पोषकद्रव्यांचा साठा वापरतात किंवा बाजूच्या मूळांपासून पुरवून घेतात. एकदा ती पोषक द्रव्ये खंडित झाली की केसगळती जाणवते. प्रत्येकात हा साठा वेगवेगळ्या दिवसांकरिता असतो, त्यांच्या दररोजच्या आहारामुळे.

hair loss after corona recovery
नाशिकमध्ये महापालिका लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी

केसगळती होत असल्यास काय करावे?

केसगळती साधारणतः ३० ते ९० दिवसांदरम्यान जाणवली तर नक्कीच आपला आहार संतुलित ठेवा. जसे हळदी दूध (कपभर), ड्राय फ्रूट्स (चार बदाम, दोन खजूर, दोन अंजीर रोज), एक फळ (ताजे फळ ऋतुनुसार), सलाड (बीट, टमाटे, गाजर दररोज), प्रथिने (एक अंडी) अथवा मोड आलेली कडधान्ये आहारात या गोष्टी वाढवाव्यात आणि दररोज घ्याव्यात. तसेच जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळाही नियमित ठेवाव्यात. परंतु काहींमध्ये आहारातून घेतलेली पोषकद्रव्ये पुरेसी ठरत नाहीत. तेव्हा अशांसाठी पूरक औषधी जसे लोह (Iron), व्हिटॅमिन (vitamin), कॅलशिअम (Calcium) असे घटक मोठ्या स्वरूपात योग्य मात्रांमध्ये घेतल्यास लवकर फरक पडतो.

hair loss after corona recovery
तुम्हाला कोरोना कॉलर ट्यूनपासून सुटका हवीय? करा हा उपाय

आहाराव्यतिरिक्त कोणती पूरक औषधी घ्यावीत?

खूप साऱ्या जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे आपण बऱ्याचदा अशी पूरक औषधे स्वतःहून चालू करतो. परंतु ते घेऊनुसुद्धा काहींना फरक पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे त्यांची मात्रा आणि त्यातील घटक हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी याला सोपा उपाय म्हणून Care 4 Hair ही संकल्पना मांडली. यात लोह, व्हिटॅमिन, कॅलशिअम, अँटिऑक्सिडंट याचा योग्य तो समतोल साधून, तसेच केसांच्या मुळांना Minoxidil लोशनचा वापर आणि Scalp स्वच्छ ठेवण्यासाठी शाम्पू यांचा वापर केसगळती रोखण्यासाठी रामबाण ठरू शकतो. आता ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्येही याचा फरक अनुभवला असल्याचे डॉ. येवले यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

(Patients suffer from hair loss after recovering from corona)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com