आकाश पगार : नवीन नाशिक- राज्यातील विविध शाळांमधील तसेच पवित्र पोर्टल प्रणालींतर्गत नवीन शिक्षकांच्या भरतीसाठी टप्पा दोन मुलाखतींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या या भरती प्रक्रियेमुळे बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता वाढली असून, शाळांमध्ये गुणवत्ता असलेले शिक्षक नियुक्त होण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.