नाशिक- अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पीसीएम ग्रुपच्या परीक्षेला शनिवार (ता. १९)पासून सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यातील दहा केंद्रांवर सरासरी ९४ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. येत्या २७ एप्रिलपर्यंत ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.