esakal | घरगुती कलहातून चक्क 55 जण घरातून पळाले; महिलांचं प्रमाण सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

घरगुती कलहातून चक्क 55 जणांचं पलायन! महिलांचं प्रमाण अधिक

sakal_logo
By
एस.डी.आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोरोनाने (coronavirus) कुटुंबात पडत असलेला दुरावा संपविला असे वरवरचे चित्र होते. परंतु, वाढलेली जवळीकताही अडचणीची ठरली. याच जवळीकतेतून क्षुल्लक कारणावरून वाद होऊन भांडणाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्यातून घरून पळ काढण्याची संख्याही वाढल्याचे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणावरून पुढे आले आहे. बदलत्या जीवनशैलीत घरात वाढत असल्याच्या कलहाचे अनके परिणाम पुढे येत आहे.

अल्पवयीन मुली, महिला, मुले घरातून पळून जाण्याच्या घटनेत वाढ

अल्पवयीन मुली, महिला, मुले क्षुल्लक कारणावरून घर सोडून जाण्याच्या घटना घडत आहेत. या संदर्भात पोलिसात हरविल्याच्या तक्रारी नोंदविल्या जात आहे. बऱ्याचवेळा घरून निघून गेलेली व्यक्ती परत आल्यानंतर पोलिसांना कळविले जात नव्हते. पोलिसांच्या जागरूकतेमुळे अशा तक्रारी निकाली निघत आहे.

व्यसनही ठरले महत्त्वाचे कारण...

कोरोनात अनेक व्यवसाय ठप्प झाले. व्यवहाय सुरू असतांना अनेकांना विविध व्यसनांनी ग्रासले. हातचे काम गेल्याने या व्यसनाची पूर्ती करणे अनेकांना कठिण झाले. यामुळे काही घरांत कलह निर्माण झाले. याच वादातून घर सोडल्याचे पोलिसांनी सांगितले. खायचे वांधे झाल्याने अनेकांचे व्यसन सुटले आहे.

हेही वाचा: नगरसेवकांना ‘रीपिट’ होण्याचा आत्मविश्‍वास

काम गेल्याने वाढले कलह…

कोरोनात अनेकांच्या हाताचे काम गेले. अनेकांनी संयम ठेवत नवीन उद्योग सुरू केले तर अनेकांची दोन वेळच्या जेवणाचीही अडचण झाली. हातचे काम गेल्याने पुरूष मंडळीचा घरी वावर वाढला. मुलांचीही शाळा बंद असल्याने तेही घरीच होते. फावला वेळ असल्याने लहान सहान गोष्टीवरून वाद वाढत गेले. वादाला कंटाळून घरून निघून जाण्याचे प्रमाणही वाढले. याच कलहातून गतवर्षभरात निफाड तालुक्यातून ५५ जणांनी पलायन केले आहे. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे, घरातून पळ काढणाऱ्यापैकी ९ जणांचा शोध घेऊन नातलगांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे. इतरांबाबत अजूनही थांगपत्ता लागत नाही, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, निफाड, लासलगाव, सायखेडा पोलिस ठाण्यात ५५ जणांनी वादाला कंटाळून घरातून धूम ठोकल्याची नोंद आहे.

हेही वाचा: Nashik Corona Updates : जिल्ह्यात 89 पॉझिटिव्‍ह

पळ काढणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक

यातील दाखल प्रकरणाचा शोध घेत ९ जणांना पोलिसांनी हुडकून काढले आहे. त्यांचे समुपदेशन करून कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आले. पळ काढणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. यात चार मुलीचाही समावेश आहे. दाखल तक्रारीत २९ महिला, चार मुली, २२ पुरूषांचा समावेश आहे. यातील सहा महिला तर ३ पुरूषांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वऱीत अद्याप बेपत्ता आहेत.

loading image
go to top