Aviral Godavari : नाशिककरांनो ! सहभागी होऊ यात, ‘अविरल गोदावरी' चळवळीत !

Dr. Rajendra Singh
Dr. Rajendra Singhesakal

Aviral Godavari : भारतीय पारंपारिक ज्ञानाचा वापर करत ब्रह्मगिरी हिरवीकंच करण्यासोबत पुरातन कुंडांचे पुनर्जीवन करत गोदावरीचा प्रवाह अविरल करण्याची संधी नाशिककरांसाठी उपलब्ध झाली आहे.

‘अविरल गोदावरी'च्या सप्तसूत्री चळवळीत नाशिक शहर आणि जिल्हावासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केलयं. नमामि गोदा फाऊंडेशन, द सत्संग फाऊंडेशन, ‘सकाळ' सोशल फाऊंडेशन आणि तरुण भारत संघ या उपक्रमात योगदान देणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्याविषयी....

(People of Nashik To participate in Aviral Godavari movement appeal by dr rajendra singh nashik news)

त्र्यंबकेश्‍वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या वरील भागातून पाणी वाहण्याचा वेग अधिक असल्याने भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गोदावरील अविरल, निर्मल, बारमाही वाहत राहण्याचा प्रश्‍न तयार झाला आहे.

तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरील मातीचे वहन होण्यातून हा भाग उजाड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या साऱ्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी समाजाचा सहभाग घेण्यासोबत पारंपारिक भारतीय ज्ञान, तंज्ञज्ञानाच्या आधारे निसर्गपूरक क्षेत्रीय उपचार करणे आवश्‍यक असल्याची बाब डॉ. सिंह यांनी ब्रह्मगिरी परिसरातील अभ्यासातून अधोरेखित केली आहे.

डॉ. सिंह यांनी नेमकी कामे कशी आणि कोणती करायची याविषयीचे दिशादर्शन केले आहे. त्यानुसार ‘अविरल गोदावरी' चळवळ येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत अंतिम चरणापर्यंत नेली जाणार आहे. ब्रह्मगिरीचा परिसर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने अधिसूचित केला आहे.

त्याच्या आधारे निश्‍चिती आणि चिन्हांकनचे काम केले जाणार आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या वरच्या भागातील उभ्या फ्रॅक्चर्समधून पुनर्भरणाचे काम केले जाईल. पाण्याचा संचय होत असलेल्या भागातील बाष्पीभवनाचा वेग कमी व्हावा यादृष्टीने निसर्गराजी फुलवण्यात येईल.

स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याचा एक भाग म्हणून वृक्षारोपणात त्यांचा सहभाग महत्त्वाचा मानला गेला आहे. हिरवळ वाढण्यासाठी गवत लावण्यात येणार आहे.

शिवाय सध्यस्थितीत असलेल्या ‘चेक डॅम'ची देखभाल-दुरुस्ती आणि नव्याने करावयाचे ‘चेक डॅम'साठी स्थानिक साहित्याचा वापर केला जाणार आहे. या कामांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे.

Dr. Rajendra Singh
Godavari Maha Aarti : गोदावरी आरतीसाठी दोन टप्प्यात 42 कोटीचा आराखडा

पुरातन कुंडांचे तीर्थाच्या स्वरूपात पुनर्जीवन

ब्रह्मगिरी पर्वताच्या भागात गोदावरीचा अविरल प्रवाह करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या २३ पुरातन कुंडांचे तीर्थाच्या स्वरूपात पुनर्जीवन केले जाणार आहे. त्यात स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने ऑक्रॉलॉजीकल तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

समाजाच्या सहभागातून निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व अग्रस्थानी असेल. ब्रह्मगिरी पर्वतावर नैसर्गिकदृष्ट्या कुंडांची रचना पाहावयास मिळते. कुंडातील अधिकचे पाणी वाहण्यासाठी नैसर्गिक मार्ग करत पाणी वाहून जाण्यासाठी पुलाची रचना पर्यावरणीयदृष्टीकोनातून केल्याचे दिसते.

अर्थात मानवी दृष्टिकोनातून अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर हिरव्याकंच आणि डोलदार वृक्ष हिरव्या पट्याचे दर्शन घडवतात. पाणी आणि मातीचे संवर्धन वृक्षराजी करत आहे.

वृक्षारोपणासाठी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून गवत लावण्यात येणार आहे. त्याचवेळी स्थानिक महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. ब्रह्मगिरीच्या स्वच्छतेसाठी अभियान राबवण्यात येणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Dr. Rajendra Singh
Aviral Godavari: काँक्रिटीकरण काढण्यासाठी प्रतिष्ठेची लढाई नको; डॉ. राजेंद्रसिंह यांचे नाशिककरांना आवाहन

विविध कामांसाठी समित्यांची स्थापना :

० ब्रह्मगिरी पाणलोट पुनर्जीवन समिती (उपसमिती-अ) गवत लावणे, ब) पूर्वीच्या ‘चेक डॅम'मधील गाळ काढणे, नादुरुस्त

भागाची डागडुजी)

० अधिसूचित क्षेत्राचे आयडेंटिफिकेशन' आणि ‘डीमार्केशन'

० ब्रह्मगिरी पुनर्जीवन समिती-पुरातन २३ कुंडांचे पुनर्जीवन (तीर्थाच्या दृष्टिकोनातून)

० ब्रह्मगिरी महिला सशक्तीकरण समिती (प्रसाद, माळा, चित्र, गाइड, फोटोग्राफर आदी)

० ब्रह्मगिरी की हरियाली समिती

० ब्रह्मगिरी स्वच्छता अभियान

संपर्क करा अन व्हा सामील !

‘ब्रह्मगिरी की हरियाली, गोदावरी की पवित्रता' उपक्रमात सर्वांना सामावून घेतले जाणार आहे. पुनर्जीवन, गवत लावणे, वृक्षारोपण, महिला सशक्तीकरण, अधिसूचित क्षेत्रातील आयडेंटिफिकेशन' आणि ‘डीमार्केशन', स्वच्छता अशांमध्ये कार्यरत असलेल्यांचे ‘ब्रह्मगिरी की हरियाली, गोदावरी की पवित्रता' उपक्रमात स्वागत असेल.

चला, तर मग नाशिक शहर आणि जिल्ह्यावासियांनी मोबाईल क्रमांक ७७०९२६४८३० यावर संपर्क करावा आणि ‘ब्रह्मगिरी की हरियाली, गोदावरी की पवित्रता' उपक्रमात सहभागी व्हावे !

Dr. Rajendra Singh
LLB CET Exam : एलएलबी-३ वर्षे सीईटी परीक्षेला सुरवात! संगणकाधारित परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com