Ganeshotsav 2023 : राममंदिर, ‘कांतारा’ची गणेशोत्सवावर छाप; नागरिकांना भुरळ!

Kantara Ganesha idol  in the market.
Kantara Ganesha idol in the market. esakal

Ganeshotsav 2023 : दाक्षिणात्य प्रसिद्ध चित्रपट कांतारा तसेच अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती असलेली गणेशमूर्ती यंदा प्रथमच बाजारात विक्रीस आल्याने नागरिकांना भुरळ पडत आहे. या दोन्ही मूर्तींपैकी काही मुर्ती बुकदेखील झाले असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

रामजन्मभूमीचे प्रतीक म्हणून प्रत्येकाच्या मनात अयोध्येतील राममंदिराची प्रतिमा घर करून आहे. गणेशोत्सव मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांच्या मनातही मंदिराची प्रतिमा निर्माण झालेली आहे.

तीच प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राममंदिर गणेशाच्या मूर्तीचे निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपट कांतारा सर्वदूर लोकप्रिय झाला आहे. (people preferring Ganesha idol with replica of Ram Mandir in Ayodhya popular south movie Kantara nashik news)

विशेष करून लहान मुलांमध्ये चित्रपटात घेऊन अधिक आकर्षण आहे. त्याचीही छाप यंदाच्या गणेशोत्सवावर दिसून आली. मूर्तिकरांकडून कांतारा गणेशमूर्ती साकारली आहे. द्वारका परिसरातील विक्री स्टॉलवर या दोन्ही मूर्ती विक्रीस आहे. चिमुकल्यांसह नागरिकांमध्ये विशेषतः सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अधिक आकर्षण ठरत आहे.

१० ते १३ फूट मूर्ती असून ३५ हजार मूर्तीची किंमत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यापाठोपाठ यंदा कपड्याचे वस्त्र, फेटा परिधान केलेल्या मूर्ती बाजारात विक्रीस आल्या आहे. घरगुती आरास उभारणाऱ्‍या नागरिकांना आकर्षित करत आहे. धोतर, मफलर, फेटे आदी विविध गोष्टींसाठी रेशम, सिल्क, जरी कपड्यांचा वापर करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष कापडाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मूर्ती डोळ्यांचे पारणे फिरत आहे. २०० ते ४५ हजारांपर्यंत मूर्ती विक्रीस आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kantara Ganesha idol  in the market.
Ganeshotsav 2023: श्रींचे वेगळेपण ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू! ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तीवर अखेरचा हात
बाजारपेठेत विक्रीस आलेली राममंदिर गणेशमूर्ती.
बाजारपेठेत विक्रीस आलेली राममंदिर गणेशमूर्ती.esakal

लालबागचा राजा, डायमंड जडीत आभूषण असलेले गणेशमूर्ती, टिटवाळा गणेश, राधाकृष्ण अवतारातील गणेशमूर्ती, झोका झुलताना बाप्पा, बालाजी मुकुटधारी, महादेव अवतार, कृष्ण अवतार, दगडूशेठ हलवाई आदी मूर्तीचे प्रकार विक्रीस आहेत.

येथून येतात मूर्ती

शहरात पेन, नगर, पनवेल आणि मुंबई अशा चार ठिकाणाहून लहान मोठ्या आकर्षक गणेश मूर्ती विक्री उपलब्ध झाल्या आहेत.

"महागाई, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बंद अफवांचा परिणाम तसेच वाहतूक, कारागिरांची मजुरी अशा विविध कारणांमुळे गणेशमूर्तीच्या दरांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे." - गोपाल चौधरी, विक्रेता

Kantara Ganesha idol  in the market.
Ganeshotsav 2023 : काजू, बदाम, चॉकलेटमध्ये सजला बाप्पा! मूर्ती बुकिंगनंतर वर्क करण्यावर भक्तांचा कल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com