
सण-उत्सव साजरे करण्यासाठी आता पुन्हा लागणार परवानगी
नाशिक : सण-उत्सव साजरे करण्यासाठी पोलिसांची घ्यावी लागणारी परवानगी काही दिवसांपूर्वीच वादाचा मुद्दा ठरली होती. अशात राज्य शासनाने निर्बंध शिथिल करताना मोठ्या उत्साहाने सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, नाशिककरांसाठी हा आनंद औटघटकेचा ठरला आहे. बुधवारी (ता. ६) पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
२० एप्रिलपर्यंत पोलिस आयुक्तालय हद्दीत हे आदेश लागू राहणार असल्याने या दरम्यान येणाऱ्या सण- उत्सवाकरिता पुन्हा पोलिसांची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात कोरोनाचे निर्बंध पूर्ण शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना सण, उत्सव जल्लोषात साजरा करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, सध्या मुस्लीम बांधवांचा सुरू असलेला पवित्र रमजान महिना, तसेच पुढील काही दिवसांवर आलेले रामनवमी, रामरथ व गरुडरथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे आणि हनुमान जयंती उत्सवानिमित्त या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्त यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करत शहरामध्ये २० एप्रिल २०२२ या काळात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहे. त्यामुळे शहरात पोलिस आयुक्तांच्या परवानगी शिवाय पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येवू शकणार नाही.
तसेच गर्दी करण्यास, जमाव करण्यास मिरवणूक काढण्यास आणि सभा घेण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वरील सण, उत्सव साजरे करण्यापूर्वी सर्वांना पोलिस आयुक्तालयाची परवानगी घेणे आता बंधनकारक ठरणार आहे. जर या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित हा शिक्षेस पात्र ठरणार आहे.
पुढील १५ दिवसांमधील सण मुस्लिम बांधवांचा सुरू असलेला पवित्र रमजान महिना
१० एप्रिल श्रीरामनवमी
१२ एप्रिल रामरथ व गरुडरथ
१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१५ एप्रिल गुडफ्रायडे
१६ एप्रिल हनुमान जयंती
Web Title: Permission Will Be Required Again To Celebrate The Festival Corona Restriction Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..