Nashik News : पेठ, दिंडोरी रोड सिग्नलवर वाहने सुसाट; नियमांचे उल्लंघन

Vehicle
Vehicleesakal

नाशिक : वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून दिंडोरी रोडवरील तारवालानगर, आरटीओ कॉर्नरसह पेठ रोडवरील बाजार समिती लगतच्या चौफुलीवर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली. परंतु, या तिन्ही चौफुल्यावर वाहतूक शाखेचा कर्मचारी अभावानेच दिसत असल्याने अनेक वाहनधारकांकडून सिग्नल यंत्रणेचे पालक होत नाही. (Peth Dindori road signal not followed by vehicles traffic police also not present nashik news)

नागरिकांच्या मागणीनंतर या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली खरी, परंतु सुरवातीपासूनच याठिकाणी वाहतूक शाखेचा कर्मचारी अभावानेच दिसत असल्याने अनेक दुचाकीधारकांसह चारचाकी, रिक्षाचालकही सिग्नल बंद असूनही वाहने सुसाट पळवितात.

त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. दिंडोरी रोडवरील चौफुल्यावरील वाढत्या अपघातांमुळे या ठिकाणी रॅम्प उभारण्यात आले. परंतु त्यानंतरही अनेक वाहने रेड सिग्नल असतानाही बिनदिक्कत चालविली जात आहेत.

दिंडोरी रोडवरील तारवाला सिग्नलसह आरटीओ कॉर्नरवरील सिग्नलवरही तीच परिस्थिती आहे. शेजारीच म्हसरूळ पोलिस स्टेशन असूनही अनेक वाहनधारक रेड सिग्नल असतानाही वाहने सुसाट वेगात चालवीत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Vehicle
Nashik Crime News : दहिदी शिवारातील विवाहितेचा खून चोरीच्या उद्देशाने; संशयित ताब्यात

धोकादायक झाड तोडण्याची मागणी

पेठ रोड सिग्नलवर मखमलाबाद रस्त्याकडून येणाऱ्या बाजूला सिग्नलला खेटून रस्त्याच्या मधोमध वडाचे खुरटलेले झाड आहे. रात्री हे झाड वाहनधारकांना दिसत नाही. त्यामुळे हे झाड तोडून टाकावे, अन्यथा हे भविष्यात अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. दिंडोरी रोडवरीलही अनेक झाडांचा प्रश्‍न न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण होऊनही ही झाडे अद्यापही तशीच आहेत.

'पेठ रोडसह दिंडोरी रोडवरील सिग्नलवर बऱ्याचदा वाहतूक पोलिस कर्मचारी नसतात. अशावेळी अनेक वाहनधारक सिग्नलची वाट न पाहता वाहने सुसाट हाकतात, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते." - सुधाकर मोराडे, गोरक्षनगर

Vehicle
Nashik MLC Election: नाशिकमध्ये सत्यजीत तांबेच निवडून येतील; अजित पवारांचा दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com