Petrol Pump
sakal
नाशिक: जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धाच्या स्थितीमुळे इंधन पुरवठ्याचा तुटवडा निर्माण होणार असल्याचा संदेश समाज माध्यमांवर व्हायरल होत होता. यामुळे बुधवारी (ता. ४) शहर परिसरातील पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. दरम्यान, तुटवड्याची अफवा असून, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासन व पेट्रोलपंपचालक संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली.