PFI Case : राममंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारण्याचा डाव!

PFI News
PFI Newsesakal

नाशिक : देशविघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया (पीएफआय) च्या अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून मिळालेली धक्कादायक माहिती एटीएसने (महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक) जिल्हा न्यायालयासमोर दिली. ‘पीएफआय’ने मॉड्युल २०४७ ची मांडणी केली असून, त्यात भारत देश संपूर्ण मुस्लिम राष्ट्र बनविण्यासह बाबरी मशिदीच्या जागी उभारण्यात येणारे राममंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा डाव असल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले.

तसेच अटकेत असलेल्या संशयितांनी परदेशात वास्तव्य केल्याचेही तपासात समोर आल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले. दरम्यान, ‘एटीएस’च्या हाती लागलेल्या काही माहितीचा अद्यापही तपास सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या पाचही संशयितांना जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (PFI Module 2047 Revealed Plan to rebuild Babri Masjid by demolishing by Ram Mandir in ATS investigation Nashik Crime News)

एटीएस (महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथक) पथकाने २२ सप्टेंबरला पहाटे कारवाई करीत मालेगावातून एक, पुण्यातून दोघे, बीड व कोल्हापुरातून प्रत्येकी एक अशा पाच संशयितांना भल्या पहाटे अटक केली होती. या अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (ता.१७) दाखल करण्यात आले. त्या वेळी ‘एटीएस’ने केलेल्या तपासाच्या आधारे संशयितांविरोधातील माहिती न्यायालयासमोर दिली.

राज्यभरात ‘एटीएस’च्या पथकांनी कारवाई केली आहे. या चौकशीतून गंभीर बाबी समोर आल्याचे सरकारी पक्षाचे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली. ‘पीएफआय’च्या मॉड्युल २०४७ संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून, त्यानुसार भारत देश संपूर्ण मुस्लिम राष्ट्र बनविण्याचा या संघटनेचा मानस आहे. तसेच, बाबरी मशिद पाडून राममंदिर उभारले जात आहे. भविष्यात हे राममंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद बांधण्याचाही डाव या मॉड्युल २०४७ मध्ये आहे.

PFI News
PFI Action Case : 'त्या' संशयितांकडे Fundingसंदर्भात कसून चौकशी

संशयितांपैकी बहुतांश जणांनी परदेश दौरे केले असून, वास्तव्यही केले आहे. त्यामुळे या संघटनेला परदेशातून मोठा आर्थिक फंड मिळत असावा वा संशयितांमध्येही संशयास्पदरीत्या आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली. संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिक्समधून मिळालेल्या माहितीचा सखोल तपास सुरू आहे. बंदी घातलेल्या ‘सीमी’च्या धर्तीवरच ‘पीएफआय’ या संघटनेची कामकाजाची पद्धत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, संशयित पाचही जणांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भविष्यात ‘एटीएस’ पथकाला पुन्हा चौकशी करण्यासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी राखून ठेवण्यात आली आहे.

PFI News
PFI Case : ‘PFI’चा बाँबस्फोटात थेट सहभाग; ‘ATS’ची कोर्टात माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप संशयास्पद

‘एटीएस’च्या तपासात संशयितांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप असल्याचे निष्पन्न झाले आहे. या ग्रुपमध्ये १७७ सदस्य असून, त्याचा ॲडमिन पाकिस्तानी नागरिक आहे. या ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, यूएई, आखाती देश, अफगाणिस्तानच्या सदस्यांचा सहभाग आहे. यासंदर्भात ‘एटीएस’ पथकाकडून सखोल तपास सुरू असून, त्यातूनही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, कुसुंबा रोड, मालेगाव, जि. नाशिक), अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८, रा. साहिल सर्वदा सोसायटी, कोंढवा, पुणे), रझी अहमद खान (३१, रा. आशोका म्युज, कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (२९, रा. माळी गल्लीजवळ, अझीज पुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. साहिल अपार्टमेंट, सिरात मोहल्ला, सुभाषनगर, कोल्हापूर)

PFI News
PFI Case : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यालय पोलिसांकडून सील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com