शिरपूर : शिष्यवृत्ती बातमी

शिरपूर : शिष्यवृत्ती बातमी
Published on: 
कल्याणी बिरारी : SHC26B13612 हर्षदा भालकर : SHC26B13613 आयुषी पेठे : SHC26B13611 ------- पटेल फार्मसीच्या तीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ८ : येथील एच. आर. पटेल महाविद्यालयाच्या कल्याणी बिरारी, हर्षदा भालकर, आयुषी पेठे या विद्यार्थिनींची पुणे नॉलेज क्लस्टर आणि बीएएसएफ केमिकल्स इंडिया प्रा. लि. यांच्या प्रतिष्ठित विज्ञान शिष्यवृत्ती २०२६- २७ साठी निवड झाली. त्यांना सहा महिन्यापर्यंत दरमहा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. कल्याणी बिरारी (पीएच.डी. संशोधक) हिची उद्योजकता प्रवर्गातून निवड झाली असून, तिला प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे अनुदानही मिळणार आहे. हर्षदा भालकर (एम. फार्मसी) हिची पदव्युत्तर प्रवर्गातून निवड झाली असून, मधुमेहामुळे होणाऱ्या, संसर्गग्रस्त व दीर्घकाळ न भरणाऱ्या जखमांच्या उपचारांसाठी प्रभावी हायड्रोजेल विकसित करणे असा तिच्या संशोधनाचा प्रमुख उद्देश आहे. बिरारी व भालकर यांना सहायक प्राध्यापक डॉ. झमीर जी. खान यांचे मार्गदर्शन लाभले. आयुषी पेठे हिची संशोधन प्रकल्प कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगातील टाकाऊ घटकांचा मूल्यवर्धित वापर करण्यावर आधारित आहे. तिला सहायक प्राध्यापक डॉ. राहुल ताडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेशा पटेल, प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.