धुळे : टुडे पान ४ साठी.. सिंगल
--
फोटो : 33592
-
प्रा. बोरसे यांना
पीएच.डी. प्रदान
धुळे : दोंडाईचास्थित स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रमोद दिलीप बोरसे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमार्फत भूगोल विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी नंदुरबार शहरातील लोकसंख्या वाढ आणि आकारशास्त्रातील बदल (१९१९१ ते २०११) या विषयावर संशोधन पूर्ण केले. चोपडा येथील दादासाहेब सुरेश जी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ यांचे त्यांना मार्गदर्शन झाले. शहरातील लोकसंख्या वाढ, विकासावरील प्रभाव, समस्या व उपाययोजनांचा अभ्यास असणारे हे संशोधन भविष्यातील नियोजनबद्ध शहर विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, पालकमंत्री जयकुमार रावल, उपाध्यक्ष रवींद्रसिंह जमादार, सचिव सी. एन. राजपूत, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, सहायक सचिव आर. टी. गिरासे, सहायक सचिव डी. एन. जाधव आदींनी कौतुक केले. ते अमराळे येथील विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष लोटन बोरसे, प्रा. शालिग्राम बोरसे यांचे पुतणे, दिलीप बोरसे यांचे चिरंजीव आहेत.