Nashik News : तुकाराम ठोक यांना वयाच्या 68 व्या वर्षी PhD; कोरोनाशी लढत असताना देखील केला अभ्यास

Tukaram Thok
Tukaram Thokesakal

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : शिक्षणाला वयाची अट लागत नाही, असे म्हणतात. हे प्रत्यक्षात आणले ते सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील सीए तुकाराम ठोक यांनी. वयाच्या ६८व्या वर्षी ठोक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये पीएच.डी. मिळवत 'हम भी कूछ कम नही' दाखवून दिले. शिवाय मागील वर्षी कोविड झालेला असताना आयसीयू मधून बाहेर निघाल्यावर सुद्धा अभ्यास या व्यक्तीने चालूच ठेवलेला होता पीएचडी व्हायची ही खूणगाठ मनाशी बांधल्याने त्यांनी आज पीएचडी मिळवली आहे. (PhD to Tukaram Thok at the age of 68 Studied even while fighting Corona Nashik Latest Marathi News)

तुकाराम ठोक हे खडांगळी (ता. सिन्नर) या गावचे असून, ते गेली ४६ वर्षे पुण्यात वास्तव्यास आहे. एका कंपनीत उच्च पदावर नोकरी केल्यानंतर आता सीए प्रॅक्टीस करतात. त्यांनी आतापर्यंत, बी.कॉम., जी.डी.सी अॅण्ड ए., एल.एल.बी. (जन). यासह अनेक पदव्या ग्रहण केल्यानंतर ‘बिझनेस इकॉनॉमिक्स’ मध्ये पीएच.डी. ही पदवी संपादन केली. वयाच्या ६८ व्या वर्षी ही त्यांची शिक्षणाची ओढ कायम आहे. अतिशय गरीब शेतकरी व एकत्र कुटुंबात वाढलेल्या तुकाराम ठोक यांना आई-वडिलांचे संस्कार, पत्नी, मुले, मुली, नातेवाईक यांचा खंबीर पाठिंबा मिळाल्याने त्यांनी हे यश गाठल्याचे ते सांगतात

श्री. ठोक यांचे प्राथमिक शिक्षण खडांगळी व वडांगळीच्या शाळेत झाले. आठवी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी जनता विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी व सिन्नर या मराठा विद्या प्रसारक नाशिक संस्थेच्या हायस्कूलमध्ये घेतले. पुढे याच संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. संगमनेर महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नुकतीच त्यांनी पीएच.डी.ची डिग्री मिळविली. त्यांना प्रा. डॉ. प्रताप फलफले व प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Tukaram Thok
BJP Mission 2024 : डॉ. भारती पवार यांची नाशिक लोकसभेत Entry

शिक्षणाबरोबर पुस्तक लेखन

शिक्षणाबरोबरच सीए तुकाराम ठोक यांनी ‘तुमच्या जीवनात शिल्पकार’ हे पुस्तक लिहिले असून त्याचेही नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात लेख यांनी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मानवी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चीदवाद व इहवाद यांचा सुंदर मिलाफ आहे. अत्यंत मौलिक व सर्व हिताय सत्य सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे करण्यात आल्याची प्रचिती दिसून येते. पुस्तकात एकंदर २१ प्रकरणे आहेत.

Tukaram Thok
SAKAL Exclusive : क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता Online होणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com