भाजीपालाखाली लपविले घबाड; पिक-अप अपघातात सत्य समोर

pickup accident
pickup accidentesakal

इगतपुरी (जि.नाशिक) : बोरटेंभे परिसरात नाशिककडून मुंबईकडे पिक-अप जात होती. पिक-अपच्या दर्शनी भागात भाजीपाला रचला होता, तर आतमध्ये काहीतरी संशयास्पद लपविले जात होते. दरम्यान टेम्पोच्या मागील चाकाचे एक्सेल तुटल्याने चाक निखळले व टेम्पो एका शेतात उलटला आणि त्याचवेळी सत्य समोर आले. काय घडले नेमके वाचा...(pick-up-accident-mumbai-nashik-highway)

पिक-अप अपघातात सत्य समोर

शनिवारी सायंकाळी पिक-अप (एमएच ०३, पीपी ३३९७) पिक-अप नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात असताना, बोरटेंभे शिवारात टेम्पोच्या मागील चाकाचे एक्सेल तुटल्याने चाक निखळले व टेम्पो एका शेतात उलटला. अपघाताची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिक-अप शेतातून बाहेर काढण्यासाठी दोन क्रेनचा वापर करण्यात आला. त्यावेळी तीन ते चार टन गोमांस या पिकअप मध्ये लपविल्याचे समोर आले. पिक-अपच्या दर्शनी भागात भाजीपाला रचला होता, तर आतमध्ये गोमांस होते. या वेळी वाहतूक बंद केल्याने एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, चालक फरारी झाला.

वरदहस्त कुणाचा? हा विषय चर्चिला जातोय

दरम्यान, घोटी व इगतपुरी पोलिसांतर्फे वाहनाची तपासणी केली जात नाही. नियमित तपासणी मोहीम राबविल्यास गोमांस वाहतुकीला आळा बसेल, अशी मागणी गोवंश संरक्षक कार्यकर्त्यांनी केली आहे. केंद्र व राज्य सरकारकडून गोवंश हत्याबंदी केली असतानाही सर्रासपणे सुरू आहे. त्याला वरदहस्त कुणाचा हा विषय सध्या चर्चिला जात आहे. मालेगाव, चाळीसगाव, संगमनेर, नाशिक येथून हे मांस मुंबईकडे पाठविले जाते. घोटी टोलनाका परिसरातून महामार्गावरून रोज शेकडो गाड्या जात असल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. त्याकडे घोटी पोलिस हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचे बोलले जात आहे. पिक-अपच्या दर्शनी भागात भाजीपाला रचला होता, तर आतमध्ये गोमांस होते. पिक-अप उलटल्याने गाडी पलटी झाल्याचे लक्षात आले, अन्यथा दैनंदिन शेकडो गाड्यांप्रमाणे ही गाडीही निघून गेली असती. दरम्यान, मुंबईला सर्रासपणे गोमांस वाहतूक सुरू असून, गोवंश संरक्षक कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

pickup accident
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे

टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल

घटनेचा पंचनामा करून इगतपुरी पोलिसांत टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, चालकाचा शोध घेतला जात आहे. पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, एस. के. शिंदे, हवालदार मुकेश महिरे, सचिन देसले आदी तपास करीत आहेत.

pickup accident
नाशिक : खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत मूक आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com