पिंपळगाव बसवंत- जिल्ह्यातील सर्वाधिक उलाढालीची बाजारपेठ म्हणून पिंपळगाव बसवंतची ओळख आहे. येथील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पंधरा वर्षापूर्वी तत्कालीन सरपंच भास्करराव बनकर यांनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने चोऱ्यांना आळा बसला होता. मात्र वर्षापासून शहरातील ९५ सीसीटीव्ही कॅमेरे देखभाल दुरुस्ती अभावी बंद आहे. त्यामुळे येथील सुरक्षा धोक्यात आल्याचे गेली पंधरा दिवसात झालेल्या घरफोडीमुळेअधोरेखित होत आहे.