Accident
sakal
पिंपळगाव बसवंत: मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत येथील टोल प्लाझालगत कादवा नदीवरील पुलावर कार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ‘मविप्र’ संस्थेच्या आदर्श इंग्लिश स्कूलच्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने महामार्गावरील अपघातांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.