पिंपळगाव बसवंत- पिंपळगाव बसवंत नगर परिषदेसाठी निवडून द्यायची नगरसेवकांची संख्या निश्चित झाली आहे. २४ नगरसेवकांच्या माध्यमतून पिंपळगाव नगर परिषदेचा कारभार आता चालणार आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यात येणार असल्याने २५ गावकारभारी असतील. सदस्यसंख्या निश्चीत झाली असली तरी प्रभागरचना व आपल्या वॉर्डात कोणते आरक्षण निघणार, यांचे वेध इच्छुकांना लागले आहे.