पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव नगर परिषदेची तिजोरी निधीअभावी रिकामी झाली असून, सध्या केवळ प्रशासकीय खर्च भागवितानाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, शहरातील विकासकामांबाबत प्रचंड उदासीनता निर्माण झाली असून, नागरिकांचे हाल सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर आदिवासी उलगुलान सेना व निर्भय महाराष्ट्र पक्षातर्फे शुक्रवारी (ता.२५) नगर परिषद कार्यालयासमोर गांधीगिरी करीत ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.