Pimpalgaon Bazar Samiti : पिंपळगाव बाजार समितीच्या उपसभापतिपदासाठी मोर्चेबांधणी; प्रशासकीय राजवट संपणार

Dilip Bankar, Anil Kadam
Dilip Bankar, Anil Kadamesakal

Pimpalgaon Bazar Samiti : पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक अभूतपूर्व अशीच झाली. आमदार दिलीप बनकर यांच्या गटाकडे सत्ता देताना त्यांच्या कामकाजावर वचक ठेवण्यासाठी माजी आमदार अनिल कदम यांच्यासह सहा तर अपक्ष यतीन कदम यांना संचालक पदावर पाठविले.

चुरशीच्या लढाईत आमदार बनकर यांनी बाजी मारल्याने सभापतीपदी चौथ्यांदा तेच विराजमान होतील यात शंका नाही. पण उपसभापतिपदासाठी बनकर हे कुणाच्या पारड्यात वजन टाकतात याबाबत उत्सुकता आहे. (Pimpalgaon Bazar Samiti Vice Chairman post Administrative rule will end nashik news)

उपसभापतिपदासाठी गोदाकाठचे जगन कुटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर यांना निसटत्या मतांनी पराभव करून विजयी झालेले शिरीष गडाख यांची दावेदारी असल्याचे बोलले जात आहे.

आठ दिवसापूर्वी झालेल्या पिंपळगाव बाजार समितीच्या निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या नावाची अधिसूचना जिल्हा निबंधक सतीश खरे यांनी घोषित केली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पिंपळगाव बाजार समितीवरील प्रशासकीय राजवट संपून सभापती, उपसभापती व संचालक मंडळाच्या हाती संस्थेचा कारभार येणार आहे.

आवर्तन पद्धतीने उपसभापतिपद ?

दीड वर्षांनी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार बनकर हे उपसभापतिपद बहाल करतील. बाजार समितीची सत्ता कायम राखण्यात गोदाकाठच्या मतदारांचा सिंहाचा वाटा राहिला, हे आमदार बनकर यांना ज्ञात आहे.

गोदाकाठला आमदार बनकर यांच्या गटाचे जगन कुटे, शिरीष गडाख हे दोन संचालक निवडून आलेले आहेत. प्रादेशिक अन्‌ सामाजिक समतोल राखण्यासाठी कुटे यांच्या गळ्यात पहिल्यांदा उपसभापतिपदाची माळ पडू शकते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Dilip Bankar, Anil Kadam
Unseasonal Rain Damage : सुरगाणा तालुक्यात अवकाळीने झोडपले; 2 तास पाऊस

मागील इतिहास पाहता आवर्तन पद्धतीने उपसभापतिपदी दरवर्षी एक म्हणजे पाच संचालकांना संधी मिळेल. गटाचे सहा संचालक निवडून आलेले माजी आमदार अनिल कदम हे सभापती निवडीत वेगळी खेळी खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण बहुमतांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी अजून चार संचालकांची आवश्‍यकता आहे.

विक्रमाची होणार नोंद

आमदार बनकर यांना तालुक्यातील दिग्गजांनी घेरलेले असताना बाजार समितीचा गड राखण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे स्वाभाविक तेच पुन्हा सभापतिपदी विराजमान होण्याची चिन्ह आहेत.

सलग २३ वर्षे सभापतिपद भूषविण्याबरोबरच सभागृहातील राजकीय स्थिती पाहता पुढील पाच वर्षे आमदार बनकर सभापतिपद भूषविण्याची शक्यता असून त्यांच्या नावावर हा आगळावेगळ्या विक्रमाची नोंद होईल.

दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीचे कवित्व संपते ना संपते तोच उपसभापतिपदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय कार्यकर्ते आडाखे बांधत आहेत.

Dilip Bankar, Anil Kadam
Unseasonal Rain Crop Damage: रब्बी हंगामातील पिके भुईसपाट; अवकाळी पावसाने बळीराजा हवालदिल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com