Gold and Silver Price
sakal
पिंपळगाव बसवंत: जागतिक अस्थिरता, युद्धाचे दाटलेले ढग आणि डॉलरच्या मूल्यात होणाऱ्या चढउतारामुळे सोनेचांदीच्या दराने आजपर्यतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पिंपळगाव बसवंत, ओझरच्या सराफ बाजारात सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅमला एक लाख ५८ हजार रूपयांपर्यत सुवर्णभरारी घेतल्याने सर्वसामान्यासाठी सोन्याचे दागिने खरेदी आवाक्याबाहेर गेली आहे. या ऐतिहासिक दरवाढीचा सर्वांधिक फटका सुवर्णपेढी बरोबरच दागिने घडविणाऱ्या हातांना बसला असून शहरातील सराफ बाजारात सन्नाटा पसरला आहे.