पिंपळगाव बसवंत- माथाडी कामगार पगाराची पंधरा लाखांची रोकड बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या सचिव राकेश दिलीप बाविस्कर यानेच अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची फेकून पंधरा लाख लुटीचा बनाव उघडकीस आला आहे. पोलिसी खाक्या दाखवताच पैसे आपल्याकडेच असल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा पिंपळगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.