पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव नगर परिषदेच्या येत्या चार महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना सोमवारी (ता. १८) जाहीर झाली. शहरात १२ प्रभागरचनेतून २५ नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. प्रभागरचनेत काहींची सोय, तर अनेकांची गैरसोय झाल्याने ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे चित्र इच्छुकांमध्ये दिसले. ३१ ऑगस्टपर्यंत प्रभागरचनेवर हरकती-सूचना मांडण्याची संधी आहे. प्रभागातील उपनगरे सोयीची जोडली गेली असली तरी अद्याप नगरसेवकपदाच्या आरक्षणाची सोडत बाकी असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.