Onion Prices Crash
sakal
पिंपळगाव बसवंत: लाल कांद्याच्या हंगामाने जोम धरलेला असतानाच शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरणारे नवे संकट उभे राहिले आहे. हंगामाच्या सुरुवातीला प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या पोळ कांद्याच्या दराला अचानक दृष्ट लागली असून, आखाती देशांसाठी निर्यातीसाठी आवश्यक असलेली जहाजे उपलब्ध न झाल्याने कांद्याचा उठाव ठप्प झाला आहे. त्याचा थेट फटका बाजारभावांना बसत असून, अवघ्या आठवड्यात लाल कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल सुमारे पाचशे रुपयांची घसरण झाली आहे.