पान-१
----------------
PML26B10333
पिंपळगाव बसवंत ः बाजार समितीत लाल कांदा लिलावाच्या शुभारंभ प्रसंगी शेतकऱ्यांचा सन्मान करताना सभापती आमदार दिलीप बनकर, शेजारी सोहनलाल भंडारी आदी.
------------------
पिंपळगावला लाल पोळ कांद्यास उच्चांकी दर
लिलाव सुरू ः पहिल्याच दिवशी ५ हजार २२२ रुपयांचा उच्चांकी बाजारभाव
--------------
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१२ ः दिवाळीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या लाल पोळ कांद्याच्या हंगामाचा गुरुवारी (ता.१२) पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीचे सभापती तथा आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करून लाल पोळ कांद्याच्या खरेदी-विक्रीला प्रारंभ करण्यात आला. लाल कांद्याचे कमाल पाच हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल दराने स्वागत झाले.
--------------
हंगामाच्या पहिल्याच दिवशी लाल पोळ कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बाजार समितीत कांद्याला किमान २ हजार ८०० रुपये, कमाल ५ हजार २२२ रुपये, तर सरासरी ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत कार्यक्षेत्रासह परिसरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असते. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत बाजार समितीत विक्रीस आलेल्या कांद्याचे पेमेंट रोखीने अदा केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
संचालक सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर, नारायण पोटे, अतुल शहा, सुरेश पारख, महावीर भंडारी, हितेश ठक्कर, अनुप थोरात, भरत ठक्कर, रवींद्र ठक्कर, अनिल जाधव, प्रकाश ठक्कर, चेतन बोरा, भाऊसाहेब पडोळ, केतन पुरकर, सुनील थोरात यांच्यासह खरेदीदार व व्यापारी उपस्थित होते. ‘शेतकऱ्यांनी आपला लाल पोळ कांदा विक्रीसाठी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोपूळ रोड येथील मुख्य बाजार आवारात आणावा’ असे आवाहन सभापती आमदार दिलीप बनकर, उपसभापती शिरीष गडाख, संचालक मंडळ व सचिव एस. डी. जाधव यांनी केले आहे.
---