धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H32191
मोहाडी : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या श्री पिंपळादेवी विद्यालयाच्या मुलींच्या संघासह मान्यवर.
---
पिंपळादेवी विद्यालयाचे
कबड्डी स्पर्धेत वर्चस्व
---
१४, १७ व १९ वर्षाखालील गटात विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मनपा अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दमदार कामगिरी केली. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुले, मुली, १७ वर्षांखालील मुले, मुली व १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. तर १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. विजेत्या संघांची नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, आक्रमकता, शिस्त आणि मैदानावरील प्रभावी रणनीतीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली. खेळाडूंना निवृत्त क्रीडा विभाग प्रमुख आर. बी. शिंदे, व्ही. बी. कापडणीस, स्वप्नील नन्नवरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या खेळाडूंच्या या उल्लेशनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष विनायक शिंदे, संचालक एस. बी. पाटील, एस. डी. बाविस्कर, व्यवस्थापक आर. व्ही. पाटील, के. आर. सावंत, समन्वयक व्ही. बी. बोरसे, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. आर. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. सोनवणे, शेखर शिंदे यांनी विजेत्या संघांचे कौतुक केले.
---