धुळे : टुडे पान २ साठी....
--
फोटो क्रमांक : 33883
धुळे : जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत पाचही गटांत विजेतेपद पटकावून यश संपादन करणारे श्री पिंपळादेवी विद्यालयाचे विजयी खेळाडू. शेजारी शिक्षक.
--
पिंपळादेवी विद्यालयाचे नेटबॉल स्पर्धेत यश
--
पाच संघांची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने झालेल्या मनपा अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी यश संपादन केले. स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुले व मुली, १७ वर्षांखालील मुली तसेच १९ वर्षांखालील मुले व मुली या पाचही गटांत विद्यालयाच्या संघांनी विजेतेपद पटकावत मानाचा तुरा रोवला.
खेळाडूंनी सांघिक समन्वय, आक्रमक खेळ, शिस्तबद्ध कामगिरी आणि प्रभावी रणनीतीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. या पाचही विजेत्या संघांची नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना निवृत्त क्रीडा विभागप्रमुख आर. बी. शिंदे, व्ही. बी. कापडणीस, स्वप्निल नन्नवरे यांचे मार्गदर्शन झाले. खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल संस्थाध्यक्ष विनायक शिंदे, संचालक एस. बी. पाटील, एस. डी. बाविस्कर, व्यवस्थापक आर. व्ही. पाटील, के. आर. सावंत, समन्वयक व्ही. बी. बोरसे, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. आर. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. सोनवणे, शेखर शिंदे, एस. एम. पाटील, एस. पी. पाटील, बी. जी. पाटील व किशोर पाटील यांनी कौतुक केले.